एव्हीजीसी (अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स) क्षेत्रात अलिकडच्या वर्षांत अभूतपूर्व वाढ झाली आहे. भारत सरकारने ‘क्रिएट इन इंडिया’ आणि ‘ब्रँड इंडिया’चा मशाल वाहक बनण्याची क्षमता असलेल्या क्षेत्राची ओळख करून या क्षेत्राला प्राधान्य दिले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2022 सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (MIB) अलीकडे एव्हीजीसी प्रमोशन टास्क फोर्सची स्थापना केली आहे.…
